logo

"सुगंध मातीचा "

"ग्रीन मोक्ष " फौंडेशन तर्फे पर्यावरण विषयक उपक्रम राबवण्यात येतात य़ा वर्षापासून या संस्थेतर्फे मराठी साहित्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी "सुगंध मातीचा " हा उपक्रम योजण्यात आला आहे .

"सुगंध मातीचा " हा दिवस कलाकृती सादरीकरण म्हणून साजरा करण्यात येतो

हा कार्यक्रम जून महिन्यातील एकाच रविवारी साजरा करण्यात येइल.


उपक्रमाची रूपरेषा :

१)मुंबई,नवी मुंबई व ठाणे परिसरातील पाचवी व त्यापुढील इयत्ता मध्ये (मराठी,इंग्रजी किंवा कोणत्याही अन्य भाषेत) शिक्षण घेणाऱ्या मुलांना सहभागी होता येईल

२)स्थानिक लोकांच्या देखरेखीखाली स्थानिक केंद्र उभारण्यात येईल

३)एका केंद्रात साधारणपणे १५-२० विद्यार्थ्यांचा समावेश असेल .

४)केंद्रामध्ये मराठी साहित्यातील नामवंत लेखकांची पुस्तके ,विद्यार्थ्यांना वाचायला देण्यात येतील .

५)आठवड्यातून ३-४ वेळा केंद्रातील विद्यार्थ्यांशी ,त्यांना आवडलेल्या पुस्तकावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येईल .

६)मराठी हस्ताक्षर सुंदर होण्याकरता , तसेच शुद्धलेखन अचूक होण्याकरता सराव व मार्गदर्शन करण्यात येईल .

७)केंद्रात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना "सुगंध मातीचा " कलाकृती सादरीकरण दिवशी संधी देण्यात येईल . यामध्ये ठराविक काळामध्ये विद्यार्थी मराठी पुस्तकातील उताऱ्याचे वाचन,एकपात्री नाटक,कविता सादरीकरण -वाचन , इ . गोष्टी करू शकतील .

ग्रंथ तुमच्या दारी हि प्रतिष्ठित संस्था ही आपल्या ह्या उपक्रमाशी सलग्न झाल्याने आपल्या ह्या उपक्रमाला वेगळे बळ मिळाले आहे .


सुगंध मातीचा अधिक माहिती साठी या संकेतस्थळाला भेट द्या .......

www.sugandhmaticha.com